मुक्ताईनगर: निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुक्ताईनगर येथे स्थायी (स्थिर) पथकाकडून वाहनांची कसून तपासणी
मुक्ताईनगर येथील नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करता आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने बोदवडकडून मुक्ताईनगर येणाऱ्या, भुसावळ कडून मुक्ताईनगर येणाऱ्या आणि बऱ्हाणपूर कडून मुक्ताईनगरकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर स्थायी पथक गठीत करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी केली जात आसल्याची माहिती दि. २१ नोब्हेंबर रोजी प्रशासनातर्फे देण्यात आली.