नागपूर शहर: नागपुरात पोलीस मार्शलवर वीटेने हल्ला; आरोपी जेरबंद
9 एप्रिल ला दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणी दुर्गावती चौकात गस्त घालत असताना बीट मार्शल आनंद सिंह यांच्यावर काही तरुणांनी वीटेने हल्ला केला. अंधारात उभ्या असलेल्या एका ट्रकच्या मागे संशयास्पद रित्या बसलेल्या तीन तरुणांची विचारपूस करण्यासाठी सिंह तिथे गेले होते.त्यावेळी पकडले जाण्याच्या भीतीने एका तरुणाने त्यांच्यावर वीट फेकून मारली, ज्यात ते जखमी झाले. मात्र, जखमी अवस्थेतही त्यांनी हिंमत दाखवत आरोपींचा पाठलाग केला.