तुमसर: शहरातील प्रभाग क्रमांक १ व २ नंतर सिंधी कॅम्प येथेही अतिक्रमणधारकांच्या जागेची मोजणीला सुरुवात
अखेर तुमसर शहरामध्ये अतिक्रमण धारकांना स्थायी पट्टे मिळणार असून तुमसर शहरातील प्रभाग क्रमांक एक व दोन मधील अतिक्रमण धारकांच्या जागेची मोजणी दिनांक 15 सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. ही मोहीम आज, 16 सप्टेंबर रोजी सिंधी कॅम्प भागातही पोहोचली असून, दुपारी 2 वाजता दरम्यान तुमसर शहरातील सिंधी कॅम्प येथून अतिक्रमण धारकांच्या जागेची मोजणी सुरू झाली आहे. या कारवाईमुळे शहरातील अतिक्रमण धारकांच्या समस्येवर तोडगा काढला जाईल, अशी अपेक्षा आहे. नगरपरिषदेने ही मोहीम शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांना...