भोकरदन: मेहगाव परिसरात जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेत शिवारात खरीप पिकांची नासाडी ,व्हिडिओ समोर
आज दिनांक 20 सप्टेंबर 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील धावडा गाव परिसरातून जवळच असलेल्या मेहेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारांमध्ये जंगली प्राण्यांकडून ज्यामध्ये नीलगाई हरण व रानडुक्कर या प्राण्यांकडून शेतकऱ्यांनी खरिपात पेरलेल्या पिकांची नासाडी केली जात आहे, अगोदरच पाऊस नाही आणि त्यामध्ये जे पीक आहे त्या पिकांची नासडी हे जंगली प्राणी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, त्यामुळे मेहगाव परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहे.