नागपूर शहर: आरटीओ अधिकाऱ्याला धमकी; पवन अरोरा विरुद्ध कपिलनगर पोलिसात गुन्हा दाखल: सतीश आडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 23 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार ड्यूटीवर कार्यरत असलेल्या आरटीओ ग्रामीण विभागाच्या सहायक मोटर वाहन निरीक्षकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी आरोपी पवन अरोरा उर्फ चिनी अरोरा याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे