अलिबाग: पाले-नागाव पुलाचा संरक्षण कठडा कोसळला
Alibag, Raigad | Jun 30, 2026 सहाण नागाव बायपास मार्गावरील पाले-नागाव येथील पुलाचा संरक्षक कठडा रविवारी पहाटेच्या सुमारास कोसळला असून हा पूला वाहतूकीकरिता अत्यंत धोकादायक बनला असून परिसरातील वाहतुकीचा आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असल्याची माहिती नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी दिली आहे. "किती वेळा हा धोकादायक झालेला पूल तात्पूरता दुरुस्त करणार आणि किती वेळा लोकांच्या जीवाशी खेळणार? पूल कोसळल्यानंतर फक्त चौकशीची नाटकं होतात, पण गेलेले जीव परत येत नाहीत.