अमरावती महानगरपालिका तर्फे आयोजित “दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन” या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन आज अमरावती येथील सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाले.या उदघाटन समारंभात शहरातील मान्यवर, अधिकारी, कलाकार, छायाचित्रकार, महिला बचत गट प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सजविण्यात आलेले सांस्कृतिक भवन दिव्य रोषणाईने उजळून निघाले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन व गणेश वंदना करून महोत्सवाचे औपचारिक