लातूर: मांजरा प्रकल्पाची गेट्स उघडली, 10 हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी नदीत
Latur, Latur | Sep 15, 2025 मांजरा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पडणारा सततचा पाऊस व पाणीपातळी नियंत्रणाच्या दृष्टीने आज दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता गेट क्रमांक 2 व 5 हे प्रत्येकी 0.25 मीटरने उघडण्यात आले. सध्या प्रकल्पाच्या सांडव्याची 6 वक्रद्वारे (क्र. 1 ते 6) प्रत्येकी 0.50 मीटर ने सुरू असून नदीपात्रात एकूण 10,482.84 क्युसेक्स (296.88 क्युमेक्स) विसर्ग सुरू आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गात वाढ किंवा घट करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.