संगमनेरमध्ये लपलेला कुख्यात गुन्हेगार अखेर गजाआड अपहरण करून खून, मृतदेह डिझेलने जाळल्याचा धक्कादायक खुलासा अहिल्यानगर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात लपून बसलेला कुख्यात गुन्हेगार दीपक पोकळे अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. अपहरण, खून आणि मृतदेह टायर-डिझेलने जाळल्यासारख्या अमानुष गुन्ह्याचा उलगडा झाल्याने संपूर्ण संगमनेर परिसरात खळबळ उडाली आहे.शिर्डी येथील सचिन गिधे याचे १० डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.