कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपटाचे प्रदर्शन होणार शासना मार्फत शिष्टमंडळ आज रवाना.
आज दिनांक 14 मे 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांच्या सुमारास कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मार्केट विभागासाठी महाराष्ट्र शासनाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव मार्फत निवडण्यात आलेल्या चार मराठी चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे यामध्ये राज मोरे दिग्दर्शित खालीद का शिवाजी, जयंत सोमळकर दिग्दर्शित स्थळ, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित स्नो फ्लॉवर, महेश मांजरेकर दिग्दर्शित जुंन फर्निचर या चित्रपटाचा समावेश असून आज शासनामार्फत शिष्टमंडळ रवाना झाले.