बोदवड: वाकी या गावात शेत शिवारात विद्युत शॉक लागून तरुणाचा मृत्यू, बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Bodvad, Jalgaon | Oct 21, 2025 बोदवड तालुक्यात वाकी हे गाव आहे. या गावातील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद पाटील वय ३० हा तरुण त्याच्या शेतात विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेला होता. तिथे सिमेंट पोल वरील लोखंडी स्टार्टर बॉक्स उघडत असताना त्याला शॉक लागला आणि तो जमिनीवर कोसळला. तातडीने त्याला उपचाराकरिता बोदवड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे