तुमसर: कारली येथील एका ५४ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, घटनेचा मर्ग गोबरवाही पोलिसात दाखल
तुमसर तालुक्यातील कारली येथील एका 54 वर्षीय महिलेचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. वनिता हनिश उईके या महिलेची दि.3 ऑक्टोबरला प्रकृती बिघडल्याने सदर महिलेला नागपूर येथील एम्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दि. 5 ऑक्टोबरला दुपारी 4 वा.च्या सुमारास वनिता उईके या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी नागपूर पोलीस पंचनामा व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून घटनेचा मर्ग गोबरवाही पोलिसात दि. 16 ऑक्टोंबर रोज गुरुवारला दुपारी 1 वा. दाखल केला आहे.