औंढा नागनाथ: भोसी येथे मिलन डे मटका जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा; एकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथे रोड लगत लपून सुरू असलेल्या मिलन डे नावाच्या मटका जूगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 28 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कारवाई करून मटका जुगाराचे व नगद असा 1290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस हवालदार विक्रम कुदनानी यांच्या फिर्यादीवरून सचिन जैस्वाल यांच्यावर औंढा पोलीस ठाण्यात 28 नोव्हेंबर शुक्रवार रोजी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोनि राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार हारकळ करत आहेत