नागपूर शहर: मालमत्ता खरेदी करताना कागदपत्रांची पडताळणी करा; वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांचे आवाहन
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी तीन मेला दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार रिअल इस्टेट किंवा कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करताना नागरिकांनी कमालीची सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात एकाच मालमत्तेची किंवा प्लॉटची दोन वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री करून फसवणूक केल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.