अंबरनाथ: बदलापूरमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या, मित्र गंभीर जखमी
बदलापूर मधील रमेशवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री जुन्या वादातून गणेश यादव याची धारदार शस्त्रांनी हत्या झाली. यावेळी त्याचा मित्र अबू हलाल शेख गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी अवनीश सिंग आणि संदीप सिंग यांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.