अक्कलकुवा: मालीआंबा गावातील विद्यार्थ्यांचा वरखेडी नदीच्या पुराच्या पाण्यातून शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास #Jansamasya
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मालीआंबा गावातील विद्यार्थ्यांचा आजही वरखेडी नदीच्या पुराच्या पाण्यातून शिक्षणासाठी जीवघेणं प्रवास सुरू आहे. एकीकडे प्रशासनाने पूल बांधण्यास निधी नसल्याचा कांगावा करतानाच गावकऱ्यांनी मिळून नदीवर लाकडी तोडका मोडका पूल बांधला मात्र दुसरीकडे नदीपात्र मोठ असल्याने रस्ता आणि पूल अभावी या गावातील नागरिक विद्यार्थी या नदीच्या पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करीत आहे.