मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गंगाझरी येथे श्रमदानातून मातीचा बांध तयार करणे.ह्या अभियानांतर्गत सकाळी ६ ते ९ पर्यंत निरंतर सुरू असलेल्या श्रमदान मोहीम चे यशश्वीरित्या “२१७” आठवडे लोकसहभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. श्रमदानातून गावातील लहान मुले, तरुण मंडळी, महिला मंडळी, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी श्रमदानातून ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले.