तुमसर: नवरगाव येथे हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर तुमसर पोलिसांची धाड, ८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
तुमसर तालुक्यातील नवरगाव येथे दि. 8 नोव्हेंबर रो शनिवारला दुपारी 4 वाजता तुमसर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी राम मदन गुर्वे यांच्या हातभट्टीच्या दारु अड्ड्यावर धाड घालून आरोपीच्या ताब्यातील प्लास्टिक पिशवीत ठेवलेली 120 किलो मोहपास सडवा असा एकूण 8 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.