हवेली: पिंपरी येथे कत्तलखान्याच्या विरोधात आंदोलन करणा-या ११ जणांची १४ वर्षानंतर निर्दोष मुक्तता
Haveli, Pune | Nov 1, 2025 २०११-१२ मध्ये स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पिंपरीतील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाखालील कत्तलखाना बंद व्हावा, तसेच महापालिकेने कत्तलखान्यासाठी दुसरी कोणतीही जागा उपलब्ध करून देऊ नये, या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले होते. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सु.भा.शेलार यांनी आज सर्व ११ आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.