भद्रावती शहरातील विंजासन परीसरातील देवालय सोसायटीत घरफोडी करुन घरातील तिन लाख रुपये रोख व दिड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट लांबविणाऱ्या आरोपीस भद्रावती पोलीसांनी अवघ्या दोन दिवसात बेड्या ठोकुन अटक केली आहे. सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे दिनांक २९ रोज शनिवारला सकाळी ११. ३०वाजता करण्यात आली. बंटी सुभाषचंद्र भद्रा, वय ४४ वर्ष राहणार खापरखेडा नागपूर असे या आरोपीचे नाव आहे.