नागपूर शहर: भांडेवाडी घरफोडीचा छडा: दोन आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त
सहा मेला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार भांडेवाडी पोलिसांनी ३० एप्रिल रोजी राकेश भुजाडे यांच्या बंद घरात झालेली चोरीची घटना उघडकीस आणली आहे. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आदित्य शिंदे आणि फैय्याज अंसारी या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून ३४,७०० रुपयांचा मुद्देमाल (मोबाईल, ड्रिल मशीन, चांदीची चेन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू) जप्त केला आहे.याप्रकरणी आयुष गणवीर आणि अंकित देशमुख या इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार