अजनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांनी तीन डिसेंबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अजनी पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून ऑनलाईन सट्टापट्टी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तब्बल 24 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांनी दिली आहे