जालना: नवीन मोंढ्यातील किराणा दुकानाचे पत्रे कापून रोख रक्कम लंपास; चंदनझिरा पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले
Jalna, Jalna | Sep 23, 2026 नवीन मोंढा परिसरातील होलसेल किराणा दुकानाच्या छताचे पत्रे कापून दुकानातील रोख रक्कम आणि किराणा माल चोरणार्या संशयितास चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. विशाल विष्णू वाढेकर, रा. जामवाडी, ता. जि. जालना असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. बुधवार दि. 23 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नवीन मोंढा, जालना येथील दिनेशकुमार ट्रेडिंग या होलसेल किराणा दुकानात 20 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 11 वाजेच्या दरम्यान चोरी झाली.