सेनगाव: विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनाला सेनगांव तालुका आस्थापनेतील महसूल सेवकांचा पाठिंबा
महसूल सेवक संघटनेच्या वतीने आज तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्यामार्फत शासनाला विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले आहे. महसूल प्रशासनाचा कणा असलेल्या महसूल सेवक यांना शासनाने अद्याप चतुर्थश्रेणीचा दर्जा दिला नसून हा दर्जा मिळण्यासाठी विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद,धरणे आंदोलन व साखळी उपोषण लोकशाही मार्गाने करण्यात येत असुन या राज्यव्यापी आंदोलनाला सेनगांव तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या महसूल सेवक संघटनेच्या वतीने या राज्यव्यापी आंदोलनात सहभाग नोंदवला.