नागपूर शहर: 'महाराष्ट्र दिना'चा विदर्भवाद्यांकडून तीव्र निषेध; संविधान चौकात काळे फुगे उडून केला घोषणाबाजीचा एल्गार
आज १ मे रोजी एकीकडे संपूर्ण राज्यात 'महाराष्ट्र दिन' मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने या दिवसाचा तीव्र निषेध करण्यात आला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील संविधान चौक परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी अनेक विदर्भवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.आंदोलनाचे स्वरूप अत्यंत तीव्र होते.