भोकरदन: पारध येथे गणपती उत्सव सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून करण्यात आले पतसंचलन
आज दिनांक 20 सप्टेंबर 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील पारध येथे पारध पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक नेमाने यांच्या नेतृत्वामध्ये पतसंचलन करण्यात आले आहे,या पतसंचलनाचे कारण म्हणजे सध्या गणपती उत्सव सुरू आहे तसेच इतर सण उत्सव सुद्धा आहे त्यामुळे सर्व सण उत्सव शांततेत व शिस्तीत पार पाडावे या पार्श्वभूमीवर हे पदसंचालन आज करण्यात आले असून याप्रसंगी पोलीस कर्मचारी होमगार्ड महिला पोलीस कर्मचारी उपस्थित झाले होते.