हवेली: संकष्टी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथील चिंतामणी च्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
Haveli, Pune | Oct 10, 2025 अश्विन महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी अजय आगलावे यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते. देवस्थान तर्फे मंदिर प्रांगण आणि मंदिराबाहेर मांडव घालण्यात आले होते, दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली.