मोर्शी: मोर्शी शहरातील पेठ पुरा येथून, दहा हजार रुपये किमतीची गाय लंपास, मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
आज दिनांक 30 सप्टेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी शहरातील पेठपुरा येथून, अंदाजे दहा हजार रुपये किमतीची गाय कुण्या तरी अज्ञातचोरट्याने चोरून नेली असल्याची तक्रार, दिलीप जानरावजी साठवणे यांनी दिनांक 29 सप्टेंबरला रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी मोर्शी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे