नागपूर शहर: नागपुरात २० ग्रॅम एम.डी. पावडरसह दोघे जेरबंद
21 जूनला दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.पाचपावली हद्दीत तांडापेठ, लाल दरवाजा परिसरात संशयास्पद स्थितीत आढळलेल्या दोघांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे २० ग्रॅम एम.डी. पावडर (किंमत २ लाख रुपये) आढळून आली. शेख इकराम शेख मुजफ्फर आणि प्रविण उर्फ टेम्प्या गणेश निमवले यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एम.डी. पावडर, दोन मोबाईल आणि एक मोपेड असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी