वैजापूर–गंगापूर रोडवरील जाखमतवाडी शिवारात शनिवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास दोन स्विफ्ट कारची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात घडला. धडक होण्याच्या काही क्षणांपूर्वी अपघात टाळण्याच्या प्रयत्नात आलेल्या मोटारसायकलचाही या दुर्घटनेत समावेश झाला. एकूण ८ जण जखमी झाले असून दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.