अर्धापूर: अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील एका 24 वर्षीय शेतकऱ्याने अतिवृष्टी व पूर परिस्थितीला कंटाळून केली आत्महत्या
आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी चार ते पाच च्या दरम्यान अर्धापूर तालुक्यातील येळेगांव येथील शेतकरी परमेश्वर नारायण कपाटे वय वर्ष 24 या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत परमेश्वर कपाटे याच्या पॅंटच्या खिशात एक चिठ्ठी सापडली . त्यात चिठ्ठी मध्ये अतिवृष्टी, पुरपरिस्थिती, नौकरी,कर्ज या कारणांमुळे आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठी नातेवाईकांना मिळाली असल्याची माहिती अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अर्धापूर पोलीस करीत आहे