आज २५ नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी पावणे सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार युवकांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात यावी, तसेच अमली पदार्थाचे वितरण होत असलेल्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यात यावे. प्रामुख्याने परराज्यातून येणाऱ्या गांजा आणि इतर पदार्थांविरोधात व्यापक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले नार्को को-ऑर्डिनेशन सेंटरची जिल्हास्तरीय समितीची मासिक सभा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.