बदनापूर: तहसील कार्यालय येथे नवीन तहसीलदार श्रीमती तेजस्विनी जाधव स्थानिकांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत
आज दिनांक एक डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजता बदनापूर तहसील कार्यालय येथे शासनाच्या वतीने नवनिर्वाचित तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्रीमती तेजस्विनी जाधव मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, आज त्यांनी तहसील कार्यालय येथे येऊन चार्ज स्वीकारला असून याप्रसंगी स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामभाऊ शिरसाठ,सोनाजी शिंदे, स्वप्निल वाघ ,सतीश साबळे यांच्यासह इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते.