घनसावंगी: भरधाव पिकअपची चिकन शॉपला जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली
कुंभार पिंपळगाव येथे सकाळी अपघात, दुकानाचे मोठे नुकसान
जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव येथे भरधाव वेगातील पिकअप वाहनाने चिकन शॉपला जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने अपघाताच्या वेळी दुकानासमोर कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र या अपघातात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेंद्राबादकडून जालन्याकडे आंब्याची वाहतूक करणारे पिकअप वाहन भरधाव वेगात जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर पिकअप थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या चिकन शॉपमध्ये घुसले. धडकेचा आवा