राष्ट्रीय सेवा म्हणजे समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची शाळा होय.राष्ट्र निर्माणात रासेयोचे महत्वाचे योगदान असून समाजास एकरुप करण्यात रासेयो भूमिका निभावत आहे.विद्याथ्र्यांनी रासेयो मार्फत विद्यापीठाचा नावलौकीक केला आहे. हल्लीच्या परिस्थितीत युवकांचा व्यसनाधिनतेकडे वाढणारा कल पाहता, युवा वर्गात जनजागृतीचे कार्य होवून युवा वर्ग व्यसनमुक्त झाला पाहिजे,याकरिता कार्यक्रम अधिका-यांनी युवा वर्गास प्रेरीत करावे असे,आवाहन कुलगुरू डॉ.मिलींद बारहाते यांनी केले.