नागपूर शहर: तहसील पोलिसांची मोठी कारवाई: अवैध पिस्तुलसह इसम अटकेत: संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सहा जुलैला सायंकाळी सहा वाजता दिलेल्या माहितीनुसार,तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने एका संशयिताला अवैध देशी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. इमरान उर्फ टिपू शेख असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे