रावेर: चिनावल येथे मुलाच्या मृत्यूनंतर आरडा ओरड करणाऱ्या इसमाला चौघांची मारहाण, सावदा पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 17, 2025 रावेर तालुक्यात चिनावल हे गाव आहे. या गावातील रहिवाशी सुराज तडवी वय ५६ यांचा मुलगा समीर तडवी याचा मृत्यू झाला होता व ते आरडा ओरड करत होते. तेव्हा याचा राग येऊन त्यांना रहेमान तडवी, असलम तडवी,कुरबान तडवी व असिफ तडवी यांनी मारहाण केली. तेव्हा या चार जणाविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.