दिग्रस: दिग्रस नगर परिषदेच्या ३ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली, जिल्हाधिकाऱ्यांने काढले पत्र
दिग्रस नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २ ब, ५ ब आणि १० ब येथील निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आहे तसा पत्र जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज दि. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान काढला. या तीनही प्रभागातील चार उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्यानंतर संबंधित उमेदवारांनी दारव्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाकडून निकाल उशिरा मिळाल्याने उमेदवारांना नामांकन अर्ज परत घेण्यासाठी तसेच निवडणूक चिन्ह वाटपासाठी आवश्यक असलेला कालावधी उपलब्ध झाला नाही.