अलिबाग: १० वर्ष प्रेमसंबंध, पण प्रेयसीने लग्नाला नकार दिला; अक्षयने टोकाचा निर्णय घेतला
Alibag, Raigad | Apr 20, 2026 प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे एका तरुणाने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना अलिबाग शहरातील रामनाथ परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, नात्यातील तणावाचा शेवट दुर्दैवी घटनेत झाल्याची चर्चा रंगली आहे. अक्षय युवराज निकाळे (वय ३०, रा. रामनाथ, अलिबाग, मूळ नाशिक) असं मृत युवकाचं नाव आहे. याप्रकरणी प्रसाद रमेश गुरव (वय ३०, रा. रामनाथ, अलिबाग) यांनी फिर्याद दिली असून, अलिबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.