घनसावंगी: खापरदेव हिवऱ्यावर निसर्गाचा कहर!..
वादळी वाऱ्यासह गारपीट; घरे, मोसंबी बागा, सोलर पंप व जनावरांचे मोठे नुकसान..
खापरदेव हिवऱ्यावर निसर्गाचा कहर!.. वादळी वाऱ्यासह गारपीट; घरे, मोसंबी बागा, सोलर पंप व जनावरांचे मोठे नुकसान.. आज दिनांक 4 गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथे गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि गारपिटीने अक्षरशः थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील घरे, शेती, फळबागा, सौर ऊर्जा प्रकल्प आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी वर्गावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.