नागपूर शहर: सिलिंडरचा स्फोट होऊन दुकानाचे मोठे नुकसान; १२ लाखांचा फटका, बोरगाव चौकातील घटना
पश्चिम नागपुरातील गिट्टीखदान परिसरातील बोरगाव चौक येथे असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे.या आगीत एका वडापावच्या दुकानासह एका हेअर सलूनचे मोठे नुकसान झाले आहे. आगीमुळे दुकानातील फ्रिज, किचनचे साहित्य आणि इतर सर्व सामान जळून खाक झाले आहे. दुकानदारांचे अंदाजे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजते.