नागपूर शहर: नंदनवनमध्ये देशी बनावटीच्या पिस्तुलसह आरोपी जेरबंद; गुन्हे शाखेची कारवाई
11 मे ला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट २ ने नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग भागात सापळा रचून आमीन उर्फ पटेल सलीम खान याला अटक केली आहे. त्याच्याकडून ५२ हजार रुपये किमतीची एक देशी बनावटीची पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.तपासात समोर आले की, हे शस्त्र त्याने शांतिनगर येथील 'वसीम चिरा' नावाच्या व्यक्तीच्या मदतीने मिळवले होते. आरोपीला नंदनवन पोलिसांच्या स्वाधीन केले असून, फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.