नागपूर शहर: लोकसभेत खासदार श्यामकुमार बर्वे कडाडले; केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयावर उपस्थित केले प्रश्न
रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी संसदेत आपला आवाज बुलंद करत केंद्र आणि राज्य सरकारच्या निधी वाटप प्रक्रियेवर महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत. खासदारांनी सुचवलेल्या विकासकामांचे प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठवण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.