या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड रोठे अक्का यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. या पदग्रहण सोहळ्यासाठी शहरासह विधानसभा क्षेत्रातून मोठ्या संख्येने नागरिक, महिला व पुरुष उपस्थित होते.या प्रसंगी आमदार प्रताप अडसड यांनी विशेष उपस्थिती लावून नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पूनम कळंबे यांनी डॉ. अर्चना अडसड रोठे अक्का यांचा शाल, श्रीफळ व पुष