७६ व्या संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचा सन्मान करण्यासाठी आज २६ नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता अमरावती विधानसभा युवक काँग्रेसतर्फे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार व संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर युवकांनी संविधानातील उद्देशिका एकत्रितपणे....