नागपूर शहर: तब्बल ६ टन प्रतिबंधित 'मांगूर' मासा जप्त, ४ जणांना बेड्या: चेतन सिंग चौहान वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बजाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंग चव्हाण यांनी 8 मे ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार,बजाज नगर पोलिसांनी शहरात प्रथमच एक मोठी आणि अनोखी कारवाई करत प्रतिबंधित असलेल्या 'मांगूर' माशांनी भरलेला ट्रक पकडला आहे. आरोग्यास घातक आणि पर्यावरणास हानीकारक असल्यामुळे सरकारने या माशांच्या पालनावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंग चौहान यांनी दिली आहे.