नवतापापासून सावध राहा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभिजीत गोल्हार यांचे नागरिकांना अवाहन
4.4k views | Gondia, Maharashtra | May 27, 2026 गोंदिया जिल्ह्यात तापमान वेगाने वाढत असून उन्हाळ्यातील अत्यंत उष्ण मानला जाणारा 'नवतपा' कालावधी सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, गोंदियातर्फे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात 'विशेष उष्माघात कक्ष' कार्यान्वित करण्यात आले आहेत.