छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या संदर्भातली माहिती आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना चाळीसगाव इथून प्राप्त झाली आहे