अमरावती: पापळ येथे स्थापन होणार कृषी महाविद्यालय, आमदार प्रताप अडसड
भाजपचे नेते अरूण अडसड यांनी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी कृषी महाविद्यालयाची मागणी केली असता तत्कालीन कृषी मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी कृषी महाविद्यालयासंदर्भात सकारात्मकता दर्शविली होती आणि आज त्याला मान्यता मिळाली.शिक्षण महर्षी डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापळ येथे स्थापन होणार कृषी महाविद्यालय अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप अडसड यांनी दिली आहे.