नागपूर शहर: नागपूर नगरी 'जय श्रीराम'च्या जयघोषाने दुमदुमली; ठिकठिकाणी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन
संपूर्ण देशासह आज नागपूर शहरातही हनुमान जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शहरातील मारुती मंदिरांमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. 'बजरंग बली की जय' आणि 'जय श्रीराम'च्या जयघोषाने अवघी नागपूर नगरी दुमदुमून गेली होती.नागपूरच्या परंपरेनुसार, हनुमान जयंतीनिमित्त शहराच्या विविध भागांतून भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या.